वृत्तपत्र / मासिकातील वाचनीय स्तंभ

वृत्तपत्र / मासिकातील वाचनीय स्तंभ येथे एकत्र करूया.. स्तंभ कॉपी पेस्ट करणे शक्य नसेल तर त्याच्या लिंका पेस्ट करूया..

बऱ्याचदा असे होते की कांही स्तंभ आवडतात आणि संकलीत करावेसे वाटतात.. असे संकलन करूया. विषयाची कोणतीही अट नाही.

सध्या काय वाचताय..? (भाग १)

नमस्कार मंडळी...

सध्या काय वाचताय..?

पुस्तकाचे नांव, लेखक, विषय आणि पुस्तकाची थोडक्यात ओळख करून द्या.. काय आवडले आहे ते सुद्धा लिहा.

आणि हो.. अशा स्वरूपाची आणखी पुस्तके वाचली असतील तर ते ही सांगा...

..मोदक

पुस्तकविश्व वाचकांच्या सेवेत परत रूजू

नमस्कार,

अनेक दिवस म्हणजे जवळपास दहा वर्ष बंद राहीलेलं पुस्तकविश्व आज परत सुरू करतोय.  पुस्तकांची वाचकांनी मराठीतून केलेली समिक्षा अशी पुस्तकविश्वची साधी संकल्पना आहे. मराठीतून असे पुस्तकाविषयी लिहीण्याचे, चर्चा करण्याचे व्यासपीठ सर्व वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. 
पुस्तकविश्व डॉट कॉमवर पुस्तकांविषयी लिहीता येईल. आपल्याला वाचायची आहेत अशी पुस्तके, वाचलेली पुस्तके, आपल्या संग्रहात असलेली पुस्तके आदी वेगवेगळ्या याद्या बनवता येतील. 

पुस्तकविश्व बांधणी चर्चा 

नमस्कार,

या पानावर पुस्तकविश्वच्या नव्याने बांधणीत आलेल्या अडचणीबाबत चर्चा करता येईल. सदस्यांना काही अडचणी असल्यास ते येथे लिहू शकतील. तसेच नवीन काही जोडले असल्यास त्याची माहिती सुध्दा याच पानावर देण्यात येईल. 
आज पुवि काही मोजक्या लोकांसोबत सुरू होतेय. हळूहळू अन्य लोकांना सांगता येईल. 

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )

http://www.chandamama.com/archive/storyArchive.htm जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा १९५२ पासून ते २००६ पर्यंतचे सर्व जुने चांदोबा मराठीतून येथे वाचता येतील. जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ...तसेच विक्रम - वेताळाच्या आणि इतर सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा :)

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -८

भाग-७ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

समाजमनाचा आढावा

पुस्तकाचे नाव

एके काळचे 'लोकसत्ता' या दैनिकाचे संपादक असलेले अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी लिहिलेले सात दीर्घ लेख सारांश या त्यांच्या पुस्तकात समावेश केल्या आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी आपल्याला लेखकाच्या वैचारिक समृद्धीची कल्पना येईल. नेतृत्वाचे प्रशिक्षण, इतिहासाचे ओझे, साहित्याचे समाजशास्त्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे राजकारण, संस्कृतीचा अपकर्ष, जीवनशैलीचा अभाव व समाजमनाचे अस्वास्थ्य हे लेख या पुस्तकात असून आपला समाज कुठल्या दिशेकडे भरकटत आहे याची पूर्ण कल्पना लेख वाचताना येऊ लागते. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समस्यावर लेखकाचा तोडगा आहे असा अभिनिवेश नाही.

सरदार पटेल: स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व

सार्वजनिक जीवनाचे अध:पतन होत असलेल्या या काळात मागच्या पिढीतील नि:स्वार्थीपणे कार्य केलेल्यांची सतत आठवण येत असते. कारण ज्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा व्यक्तिमत्वांची उणीव भासत आहे. म्हणूनच आपण इतिहासातल्या पानांत अशा निस्पृह व्यक्तींच्या शोधात असतो. अशा काही स्फूर्तीदायक व्यक्तींच्यापैकी सरदार पटेल यांचे नाव समोर येते. गांधी - नेहरूबरोबर काम केलेले पटेल यांनी आधुनिक व अखंड भारताचा पाया घातला. परंतु धर्मवाद व जातीयवादाची टोकाची भूमिका घेणार्‍या काही हितसंबंधींना थोर व्यक्तींच्या चारित्र्यहननात आसुरी आनंद मिळत असतो.