पुस्तकविश्व वाचकांच्या सेवेत परत रूजू

नमस्कार,

अनेक दिवस म्हणजे जवळपास दहा वर्ष बंद राहीलेलं पुस्तकविश्व आज परत सुरू करतोय.  पुस्तकांची वाचकांनी मराठीतून केलेली समिक्षा अशी पुस्तकविश्वची साधी संकल्पना आहे. मराठीतून असे पुस्तकाविषयी लिहीण्याचे, चर्चा करण्याचे व्यासपीठ सर्व वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. 
पुस्तकविश्व डॉट कॉमवर पुस्तकांविषयी लिहीता येईल. आपल्याला वाचायची आहेत अशी पुस्तके, वाचलेली पुस्तके, आपल्या संग्रहात असलेली पुस्तके आदी वेगवेगळ्या याद्या बनवता येतील. 

पुस्तकाची समिक्षा, पुस्तकाच्या स्पर्धा, कोडी आदी विषयक पुस्तकविश्ववर लिहीता, वाचता येईल. मराठी पुस्तक विश्वाच्या घडामोडींवर चर्चा करता येईल. 

फार महत्वाची सूचना - पुस्तकविश्ववर कुठल्याही पुस्तकाची पिडीएफ़ किंवा अन्य कुठलिही प्रत शेअर करू नये. पुस्तक पायरसीमुळे आधीच अडचणीत असलेली मराठी पुस्तक व्यवहार अधिकच अडचणीत येतोय. खरा वाचक अशी पायरसी कधीच करणार नाही. 
पुस्तकविश्ववर आपले सर्वांचे स्वागत आहे. पुस्तक विश्व वापरताना काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला येथे विचारू शकता.    
 

प्रतिक्रिया