सध्या काय वाचताय..? (भाग १)

नमस्कार मंडळी...

सध्या काय वाचताय..?

पुस्तकाचे नांव, लेखक, विषय आणि पुस्तकाची थोडक्यात ओळख करून द्या.. काय आवडले आहे ते सुद्धा लिहा.

आणि हो.. अशा स्वरूपाची आणखी पुस्तके वाचली असतील तर ते ही सांगा...

..मोदक

सध्या पुन्हा महाभारत वाचतोय. शांतिपर्वातील राजधर्मानुशासनपर्व सुरू आहे. ह्यावेळी महाभारत जरा वेगळ्या प्रकारे वाचणे झाले. बऱ्याच टिपा काढल्या, भांडारकर संशोधित प्रतीतील मूळ संस्कृत श्लोक पडताळून पाहिले. असे बरेच काही काही केले.

In reply to by वल्ली

वाह..!! पूर्वी ज्ञात असल्यापेक्षा एकदम नवीन.. एकदम क्रांतिकारी अशी कांही माहिती सापडली का? ;)

In reply to by मोदक

ती तशी सापडतेच दरवेळी, नवीन काहीतरी गवसतं. उदाहरणार्थ युधिष्ठिराची दिनचर्या द्रोणपर्वात एका ठिकाणी वर्णिली आहे. यावरून तत्कालीन राजांची दिनचर्या कशी असावी हे लक्षात येते.

 

 

 

मनु पिल्लई यांचे रिबेल सुलतान  हे  दख्खनच्या सुलतान (शाही ) बाबत पुस्तक वाचतोय.  यादवकाळापासून अल्लाउद्दीन खिलजी, विजापूरचे शहा, अहमदनगर, कुतुबशाहा, मलीक अंबर, शहाजी महाराज, शिवाजी महाराज अशी मांडणी आहे. 

सहसा दिल्ली केंद्रित मांडणीत दख्खन दुर्लक्षीत असते. या पुस्तकात फोकस दख्खनवर आहे. 

  

सध्या हर्मन हेस यांनी लिहिलेले सिद्धार्थ हे छोटेखानी पुस्तक वाचतो आहे. पुस्तकाचा नायक सिद्धार्थ हा बुद्धाचा समकालीन दाखवलेला आहे, जिथे पर्यंत वाचले आहे तिथे नायकाची एकदा गौतम बुद्धांची भेटही झालेली आहे. पुस्तक वर्ल्ड क्लासिक आहे म्हणून वाचायच्या यादीत होते, पूर्ण वाचून झाले की पुन्हा इथे टाकेन.