पुस्तकविश्व बांधणी चर्चा 

नमस्कार,

या पानावर पुस्तकविश्वच्या नव्याने बांधणीत आलेल्या अडचणीबाबत चर्चा करता येईल. सदस्यांना काही अडचणी असल्यास ते येथे लिहू शकतील. तसेच नवीन काही जोडले असल्यास त्याची माहिती सुध्दा याच पानावर देण्यात येईल. 
आज पुवि काही मोजक्या लोकांसोबत सुरू होतेय. हळूहळू अन्य लोकांना सांगता येईल. 

प्रतिक्रिया

सर्वप्रथम पुस्तकविश्व पुन्हा सुरू केल्याबद्दल मालकांचे खास आभार. मला जाणवलेल्या काही त्रुटी- १. अँड्रॉइड मोबाईलवरून लिहिताना गुगल इंडिक फॉन्ट असल्याने मराठीत टाइप करता येते मात्र विंडोज संगणकावरून लिहिताना मराठीत टाइप करता येत नाही किंवा भाषा बदलाचा पर्यायही येत नाही. २.नवी प्रतिक्रिया आली की ती मुख्य पानावर ती सर्वात आधी दिसायला हवी, तसे न दिसता नवा धागाच आधी दिसतो, नव्या लेखनाप्रमाणे वर्गीकरण व्हायला हवे. ३. किती सदस्य आणि कोण कोण आलेले आहेत ते दिसत नाहीत. अजून काही त्रुटी निदर्शनास येताच इथे अद्ययावत करेन.

In reply to by वल्ली

आपण येथे प्रयोग करतो त्यासोबत मिपाचे अनुभव सोबत ठेवतोय.  तेथे सध्या गमभन वापरतोय. 

गमभन हा मराठी लिहिण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र त्याचा आणि गुगल क्रोम ब्राऊजरचा काहीतरी इश्यू आहे.  

गमभन चे नवीन मोडयूल तयार नाही. श्री ओंकार जोशीनी एक नवीन पध्दत दिली आहे.  ती वापरू शकतो. 

आपले वाचक व सदस्य हे ७०% मोबाइल ब्राऊजीग करतात तेथे गमभन चालत नाही.   

सध्या असलेल्या विंडोज ७ ते १० पर्यंत सर्वात मराठी लेखनाचे इनस्क्रीप्ट व फोनोटिक हे पर्याय उपलब्ध आहेत.  मग साईटवर स्क्रिप्ट लावणे गरजेचे आहे का? 

असे अनेक विचार सुरू आहेत.  यावर चर्चा होऊ द्या. जे ठरेल तसे करूया.  

 

सध्या मुख्य पानावर नवे लेखन वर अशी मांडणी आहे. थोडं काम बाजूला झालं आणि साहित्य यायला लागलं की तसा बदल करून देईल. 

सध्या कोण कोण आलंय ते दिसत नाही. लवकरच असे दिसावे असा प्रयत्न करतो. 

 

In reply to by admin

मला तरी स्क्रिप्ट असणे सोयीचे वाटते. होतं काय, पीसीवर ऑफीसचं काम करता करता मधेच इनपुट मेथड बदलणे थोडे जिकिरीचे वाटते. कदाचित मला मिपाच्या गमभनची खूप सवय असल्यामुळेही असेल.

लगेचच अजून एक त्रुटी मिळाली. परिच्छेद पाडता येत नाहीत, एकाखाली एक मुद्दे मांडताच प्रकाशित केल्यावर ते एकाच परिच्छेदात सामावले जाते.

In reply to by वल्ली

प्रतिक्रियेच्या खाली; उजवीकडे टेक्सटचा फॉरमॅट Filtered HTML बदलून Full HTML केल्यास परिच्छेद जमू शकेल.

टेक्सट ऐवजी टेक्स्ट असा बदल करायला हवा...

In reply to by मोदक

धन्यवाद.

ह्याने काम होतंय, हे सेटिंग डिफॉल्ट हवे मात्र.

In reply to by वल्ली

आता तुम्ही पहिल्या पानावर आल्यावर लक्षात आले असेल की प्रतिक्रिया नवीन असेल तर तसे रिकामे राहत नाही. 

आज मोदक यांचा वृत्तपत्र / मासिकांतील वाचनीय स्तंभ नावाच्या लेखावरून असे जाणवले की येथील चर्चासाठी लेखन प्रकार असावेत.  या लेखन प्रकाराचा फायदा असा असतो की पुढे कधीही यातील एका प्रकारावत क्लिक केले की सगळे या लेखमालेतील  समोर येतील. 

शक्य असल्यास येथे काही प्रकार द्यावेत. म्हणजे ते जोडता येतील.  

In reply to by admin

मला सुचत असलेले चर्चप्रकार.. पौराणिक / महाभारत / रामायण जागतिक महायुद्धे इतिहास - जागतिक इतिहास - भारतीय इतिहास - भारतीय स्वातंत्र्य लढा राजकारण - जागतिक राजकारण - भारतीय आत्मचरित्र / चरित्र उद्योजक खेळ भटकंती - किल्ले, लेणी भटकंती - भारत भटकंती - परदेश धार्मिक वैद्यकीय फिक्शन (मराठी?) नॉन फिक्शन (मराठी?) इतर असेच प्रकार अपेक्षित आहेत का?

In reply to by मोदक

हो. हेच प्रकार आपल्याला पुस्तकासाठी जोडता येतील.

१) हजर सदस्य नावाचा ब्लॉक जोडला आहे. 

२) पुस्तक परिचय नावाच्या साहित्य प्रकारात आता जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाचा परिचय देतो तेव्हा त्या पुस्तकांची लिंक यायची. आता त्या लिंक च्या जागेवर त्या पुस्तकांची माहिती येते. जसे मुखपृष्ठ , लेखक, प्रकाशक, किमत आदी. 

३) आता पुस्तकाविश्वकडून गेलेली ईमेल इनबॉक्स मध्ये जाते. स्पॅम म्हणून नोंद होत  नाही. 

४) आपल्या सदस्य नोंदसाठी आधी स्पॅम व्हायचे  त्यासाठी एंटीस्पॅम लावले आहे. 

 

बाकी कामे - 

१) उत्तम सर्च 

२)नवीन पुस्तक जोडणी 

३) मेन्यू 

४) पुस्तके , प्रकाशक आणि लेखक याद्या. 

५) वेगवेगळ्या याद्या बनवता आल्या पाहिजेत.