वैदेही यांच्या निवडक कथा

पुस्तकाविषयीची प्राथमिक माहिती

मुखपृष्ठ

Book Cover Image
कविता महाजन ह्यांनी संपादित केलेल्या भारतीय लेखिका मालिकेतील तिसरे पुस्तक-- वैदेही ह्या लेखिकेच्या कन्नड भाषेतील कथांचा उमा कुलकर्णी ह्यांनी मराठी अनुवाद केलेला संग्रह. एका स्त्रीच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील अनुभवांचा कथाविष्कार. त्यातून दिसणारे स्त्री-मन तर आहेच, शिवाय भारतीय (खासकरून दाक्षिणात्य- कर्मठ) संस्कृती आणि ह्या सं...स्कृतीत जगणार्‍या माणसांचं जगणं अलगदपणे मनाला स्पर्श करणारं आहे. सर्वसामान्य स्त्रियांच्या जगण्यातील सुख-दु:खं तसेच परंपरांना, रिती-रिवाजांना नाकारत जगण्यातील ताण-वेदनासुध्दा ह्यात आहेत. स्त्रीची धैर्यशील वृत्ती, समजूतदारपणा, चिवट जीवनेच्छा ह्यांचा शोधक नजरेने घेतलेला वेध ह्या कथांत आढळतो. लांबलचक वाक्यरचना हे ह्या कथांचं वैशिष्ट्य. त्यामुळे एकाच वेळी एका वाक्यातून अनेक गोष्टींचं यथार्थ चित्रण. उदा. व्यक्ती, वातावरण, मनोवस्था, इ. पुन:पुन्हा वाचावासा वाटणारा एक वाचनीय कथासंग्रह.