सु.शि.स्पेशल प्रश्नमंजुषा

मित्रांनो, चला! खेळुया! १. मोटेल दिलखुलास चे प्रस्तावीत मुळ नाव काय? २."''बोगम" हे पात्र कोणत्या कादंबरीत आहे? ३."फ्रिस्टी" हा उल्लेख कोणत्या कादंबरीत आहे? ४.दुनियादारी कादंबरीत प्रितम व श्रेयस रुपाली होटेल मध्ये कोणती दोन गीते ऐकतात? व त्यांचे गायक कोण? ५."पद्या" नावाचे निखालस रिकामटेकडे पात्र कोणत्या पुस्तकात आहे? ६ न्यायाधीश खुनी असलेली कादंबरी कोणती? ७.दारा व अस्लम एक अतिशय जहाल मादक पेय पितात्,त्याचे नाव काय? ८.अम्र विश्वास ची सचिव मोहिनि हीचे मुळ नाव काय? ९ सु.शिं.च्या पुस्तकांमध्ये दोन सुप्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्श़कांच्या नावावर बेतलेली पात्रे येतात्.ती कोणती?(एक दिगदर्शकाचे टोपण नाव) १०.पीटर गायकवाड हा कोणत्या कादंबरीत नायक आहे? -उत्तरे,बुधवार पर्यंत(३१/०५/२०११) पहीलाच प्रयत्न आहे!सांभाळुन घ्या! -देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.

देवेन्द्र मित्रा या प्रश्नमंजुषेने मी सुहास शिरवळकरांचा पंखा असल्याचा अभिमान गळून पडला :( एकसे बढकर एक प्रश्न आहेत. किंबहुना वाचन कसे करावे याचे धडेच तुझ्या प्रश्नमंजुषेतून मिळत आहेत :) काही उत्तरे पाठवली आहेत.

In reply to by सागर

अगदी २ ते ३ च प्रश्नांची उत्तरे येत आहेत. तरी आज संध्याकाळपर्यंत व्यनी करण्याचा प्रयत्न करतो.