प्रश्नमंजुषा क्र.५

मित्रांनो, बरेच दिवसां नंतर! प्रथमत; क्षमस्व! चला,खेळुया! खालिल प्रस्तवना कोणत्या पुस्तकांच्या,, १.अजुन अश्रुंनीच दार ठोठावणार्या दारिद्रयास! २.शंभरातील नव्याणवास-- ३.टु इन्ग्रिड बर्गमन--- ४.पड्घम -कादंबरी-लेखक? पडघम्-नाट्क्-लेखक? ५आघाडिच्या मराठी चित्रपट पट्कथाकाराने व जब्बार पटेल ह्यांची प्रस्तावना असलेला कथासंग्रह कोणता? ६ निकोलाय गोगोल च्या"inspector general" वर आधारीत मराठी नाट्क कोणते? ७.IAS अधिकारी असुन्सुध्दा मराठी कादंब्या व इतर लेखन करणारे(सातत्याने)तीन मराठी लेखक कोण? ८.बहिणाबाई चौधरी ह्यांचया कविता जगासमोर आणणारे साहित्यिक कोण? ९."तीन मुले"ह्या साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारलेला सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट कोणता? १०.महाराष्ट्र बॅकेतील अधिकारपदाची नोकरी सोडुन विशेषत; चित्रपटांवर लेखन करणारे सध्याचे लेखक कोण? उत्तरे रवीवार पर्यंत--- -देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.