ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९१

पुस्तकाचे नाव

या लेखकाचे चाहते असाल तर संकेताची गरज पडणार नाही. पण नसाल तर नक्की संकेताची गरज पडेन :) तसेही वेच्यातच अनेक संकेत आहेत. पण तरी गरज पडली तर उद्या संकेत देईन. संकेत क्र. १ : ही एक भारतीय लेखकाची अनुवादीत कादंबरी आहे. आणि या लेखकाची अनेक पुस्तके इंग्रजीतून गाजलेली आहेत. संकेत क्र. २ : याचे अनुवादक खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांची इतिहासावरची कित्येक पुस्तके प्रसिद्ध आहेत. संकेत क्र. ३ : या पुस्तकाच्या डाव्या बाजूच्या कोणत्याही पानांवर पान क्रमांक छापलेले नाहियेत. पुस्तकाच्या या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे हे पुस्तक वाचकाच्या लक्षात राहणारे आहे. पुढील संकेत अगदी स्पष्ट दिशानिर्देश देणारा असेन. :) संकेत क्र. ४. लेखकाने हिंदुस्थानी सैन्याच्या मराठा लाईफ इन्फन्ट्रीत सेवा केली आहे. (आता कोणीही ओळखावे ;) ) या वेच्याचे पहिले विजेते आहेत वल्ली - अभिनंदन :) दुसरे विजेते आहेत टण्या. जरी त्यांनी व्यनि केला नसला तरी त्यांच्या प्रतिसादातच स्पष्ट संकेत आहे तिसरे विजेते आहेत श्रावण मोडक. येथील आपले एक पुस्तकप्रेमी मित्र देवेद्र प्रभुणे यांनीही अपेक्षेप्रमाणे ओळखले आहे. ते आहेत चौथे विजेते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) उत्तर: पुस्तकाचे नाव : दि प्रिन्सेस लेखक : मनोहर माळगांवकर अनुवादक : भा.द.खेर (यांची चाणक्य, नेपोलियन अशी कित्येक ऐतिहासिक पुस्तके प्रसिद्ध आहेत ) वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक २८८ (३ री आवृत्ती) वेचा: ------------------------------------------------ मिनीच्या मुद्रेवर जो असहायतेचा भाव होता तें केवळ तिचं शस्त्र होतं. त्यामुळे तिचं खरं स्वरुप झाकाळून जाई. वस्तुतः तिच्या निर्ढावलेल्या मनावर ओढलेला तो एक प्रकारचा बुरखा होता.तिचे चंचल, विशाल नेत्र आपल्या सावजाचा शोध घेण्यांत सदैव गुंतलेले असत. एखाद्या सावजाकडून किती किंमत काढावी, असा हिशेब तिच्या मनाशीं चाले, कोणत्याहि बाबतींत फायद्याचं कलम ती पाहत असे. त्या दिवशीं संध्याकाळीं मिनीविषयी माझ्या भावना मुळीच कडवट झालेल्या नव्हत्या; कारण मनातल्यां मनांत ही गोष्ट मी जाणून होतो की, माझ्या आयुष्यांत माझ्या पुरुषत्वाला आवाहन करणारी पहिली स्ती जर कुणी असेल तर ती मिनी होती. माझ्यांतील पुरुषत्व पहिल्या प्रथम तिनंच जागृत केलं होतं. माझं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी तिनं आपलं शरीर मला देऊं केलं होतं. तिचं ते ऋण कृतज्ञतापूर्वक कबूल करणं मला भागच होतं. तें मी नेहंईच मान्य करीत आलों होतो. मी मिनीकडे बघत असतांना टोनी साइक्सचा विचार माझ्या मनांअ आला. तिनं त्याच्यावर केलेलं प्रेम मला आठवलं. मी जें काय करणार होतों ते करण्यांत टोनीशीं बेइमानी होणार होती का, असाहि विचार माझ्या मनाला चाटून गेला. पंच-विषयी मात्र माझ्या मनांत कोणताच विचार आला नाही, या गोष्टीचं मला आश्चर्य वाटल्यांवाचून राहिलं नाही. ------------------------------------------------

In reply to by वल्ली

वल्ली मित्रा, अभिनंदन, या वेच्याचा पहिला विजेता होण्याचा मान तुझा. उत्तर बरोबर ओळखले आहेस :) अजून एकाने ओळखल्यावर उत्तर जाहीर करेन

In reply to by सागर

संकेत ४ इतका ठळक आहे की त्यावरून लेखकाचे नाव पटकन डोळ्यांसमोर यायलाच पाहिजे. एकदा लेखक समजला की पुस्तक ओळखणे फारसे अवघड जात नाही. आणि त्यातही जे पुस्तक पहिल्यांदा डोळ्यांसमोर येते तेच हे या वेच्यातील पुस्तक.

मराठी अनुवाद नाही वाचलेला.. पण मूळ कादंबरी उत्कृष्ट आहे.. माझ्याकडूनपण संकेत देतो एक.. ह्या लेखकाच्या एका पुस्तकाचा अनुवाद पुलंनी केला आहे :)

In reply to by टण्या

या लेखकाची मोहीनी कित्येक मोठ्या साहित्यिकांना पडलेली होती आणि अजूनही आहे. :) पु.लं.ना त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीला सोडून केलेल्या या अनुवादित पुस्तकाने एकदम वेगळे परिमाण दिले.

In reply to by सागर

मनोहर माळगांवकर यांचे पु.लं.नी अनुवादीत केलेले पुस्तक म्हणजे "कान्होजी आंग्रे" हे पुस्तक मुळात वाचल्यावर पु.लं.नी हे सुंदर पुस्तक मराठीत आणायचा ध्यासच घेतला होता. म्हणूनच कान्होजी आंग्रे हे सुंदर पुस्तक मराठीतही वाचकांना उपलब्ध झाले.