पुस्तककोडे - ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे? क्र. ८८

पुस्तकाचे नाव

वाचनप्रेमींसाठी ‘खास’ उतारा घेतला आहे. देवेन्द्र प्रभुणे, सागर, श्रावण मोडक, टण्या..... अभिनंदन!!!!! साहित्य नसेल तर मानवी जीवन अपरंपार समृध्द करणारा आणि त्याच वेळी एक अनिर्वचनीय आनंद देणारा महान ठेवा आपण हरवून बसू. ----च्या पहिल्याच (ऑगस्ट १९९५ अंकातल्या) संपादकीयाची सुरुवात होती: ‘शब्दब्रह्माचा महिमा काही और आहे. लोकलमधून लोंबकळताना हातातलं मासिक कसंबसं वाचणार्‍याच्या गालावर एखादा चुटका वाचून उमटणारं मंद हसू आणि रुसो-व्हॉल्टेअरच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन बॅस्टिलचा तुरुंग फोडायला निघालेल्या फ्रेंच क्रांतिकारकाच्या डोळ्यातील उन्माद, हे शब्दब्रह्माच्या प्रभावाचेच दोन टोकाचे आविष्कार. दलाल स्ट्रीटवरचा जल्लोष आणि टीव्हीवरचा रंगीबेरंगी चंगळवाद ह्यांच्या पलीकडच्या एका आगळ्या विश्वात साहित्य तुम्हांला घेऊन जातं.....’ संकेत क्र. १: लेखक एका ख्यातनाम मासिकाचे संपाद्क आहेत

चित्रा एका सुंदर व्यक्तीमत्त्वाची ओळख करुन दिलीस तू. या मासिकाचा संघर्ष हा एक इतिहासच आहे. अडचणीच्या काळातही या थोर लेखक संपादकांनी या मासिकाचा भार पेलून धरला.

देवेन्द्र प्रभुणे आणि सागर.... दोघांनी जवळ-जवळ यशस्वी प्रयत्न केला आहे. पण देवेन्द्र लेखकाच्या-पुस्तकाच्या नावात आणि सागर पुस्तकाच्या नावात गोंधळले आहेत. बाकीचे नेहमीचे यशस्वी कुठे आहेत? वल्ली, यशोधरा, टण्या, ऋषिकेश, नंदन, आनंदयात्री, मुक्तसुनीत, मणिकर्णिका, चिंतातुर जंतु........ सगळे आहेत कुठे? जेवढी आठवताहेत तेवढी नावे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचे नाव नसल्यास कृपया राग मानू नये. ही अशी चित्र-विचित्र नावे लक्षात ठेवणे अवघड जाते बाबांनो!!!!!!!!!!!

In reply to by चित्रा राजेन्द…

हा वेचा ओळखणे अवघड आहे माझ्यासाठीतरी. तरी लेखकाच्या नावाचा अंदाज व्यनिद्वारे पोचवला आहेच. जास्तीचे संकेत लागतीलच. सागर आणि देवेंद्रने परत आपला दर्दीपणा सिद्ध केला आहे. :)

In reply to by चित्रा राजेन्द…

वाटले होतेच की पुस्तकाचे नाव चुकणार. कारण जे चाळले होते, त्यात कुठंही हा उल्लेख आल्यासारखे वाटत नव्हते. याचा अर्थ हे पुस्तक अत्यंत नवे आहे. :) मी ते वाचलेले नाही.

In reply to by श्रावण मोडक

याचा अर्थ हे पुस्तक अत्यंत नवे आहे हाही एक संकेत ;) हे नवे पुस्तक बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे कारण २००९ मध्ये पहिली आवृत्ती आल्यावर हातोहात खपले. आणि २०१० मध्ये लगेचच दुसरी आवृत्ती काढावी लागली ... हेच असणार :)

In reply to by सागर

मालक वेचा गंडवतोय. कारण इथं जो मजकूर आला आहे, तो बहुदा भानू काळेंच्या एका जुन्या पुस्तकातही आहे आणि ते पुस्तक आहे २००५ च्या आधीचे. आता हे खरे असेल तर...? जाऊ दे, चित्रा कधी उत्तर देतेय तेच पाहू. :)

In reply to by श्रावण मोडक

हे चित्राने कन्फर्म केले आहे :) कारण इथं जो मजकूर आला आहे, तो बहुदा लेखकाच्या एका जुन्या पुस्तकातही आहे नेमका याचमुळे माझा आधी गोंधळ झाला होता. लेकीन अब सब ठीक है :) नेमके पुस्तक ओळखले आहे...

In reply to by सागर

अच्छा. म्हणजे एकूण अंतरात्म्याचा आवाज वगैरे दिसतोय. आपल्याला तसे पुस्तक ओळखता येणार नाही. ;)

In reply to by श्रावण मोडक

श्रावण, अगदी अगदी अस्सेच म्हणतो... :) अगदी आतल्या आवाजाचे धावे केले तरच पुस्तक ओळखता येईल ;) हा हा हा :)

पुवि सदस्यांच्या प्रतिसादांमध्ये इतके संकेत येउनही ओळखू शकलो नाहीच. अर्थात अजूनही संकेत आले असते तरी अशक्यच होते मला. लेखकाचे नाव फक्त ऐकून माहिती आहे. लेखक भानू काळे हे नेमक्या कुठल्या मासिकाचे संपादक आहेत?

In reply to by वल्ली

विसरलास काय मित्रा अंतर्नादची सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीचा उपक्रम :) हा घे दुवा

In reply to by सागर

पूर्णपणे विसरलो होतो, आणि लक्षात असले तरी माझ्यासाठी हा वेचा ओळखणे असह्क्यच होते. :(