ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८७

पुस्तकाचे नाव

संकेत क्र. १ : मराठीतील ही अतिशय गाजलेली कादंबरी आहे. आणि वेच्यातच अनेक संकेत दडलेले आहेत. :) अन्य संकेत : शक्यतो गरज पडणार नाही. पण पडलीच तर उद्या देईन. तोपर्यंत वैयक्तिक निरोपाने उत्तर पाठवावे. xxxxxxx लपवलेला भाग पुढे संकेत म्हणून गरज पडली तर देईन. संकेत क्र. २ : ही एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीवरची ऐतिहासिक कादंबरी आहे संकेत क्र. ३ : या कादंबरीचे लेखक कादंबर्‍यांची नावे नेहमी एकाच शब्दाची,शक्यतो लहान आणि समर्पक देतात. संकेत क्र. ४ : लपवलेला भाग वेच्यात वाढवलेला आहे. (इथे प्रतिसादात दिलेला आहे) दिगम्भा हे या वेच्याचे प्रथम विजेते आहेत आणि वल्ली दुसरा विजेता आहे. तिसरी विजेती आहे यशोधरा. या तिघांनी हे पुस्तक विनाकष्ट ओळखले. :) उत्तर जाहीर करतो आहे. दिगम्भांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे वेच्यातच खूप संकेत दडलेले होते त्यामुळेही हे पुस्तक अनेक जण ओळखू शकतील असा माझा अंदाज होता. अर्थात पुस्तक वाचलेले नसल्यास सर्वांनी अवश्य वाचावे ही विनंती. एका नजरेआड राहिलेल्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वाची ही अफलातून कहाणी आहे. वेच्याचे उत्तरः पुस्तकाचे नाव : झेप लेखक : ना.सं.इनामदार (या लेखकाच्या सर्व कादंबर्‍यांची नावे एका शब्दाचीच आणि अर्थपूर्ण असतात. जसे शहेनशहा, राऊ, राजेश्री,इ..) वेचा: --------------------------- "रविराव मला एक वचन दे!" "वचन? कसलं वचन? " "केशरची गोष्ट तू मनातून काढून टाक. तिला विसरुन जा!" का? माझा झाला एवढा अपमान पुरा झाला नाही म्हणून या वर डागण्या? " रविराव रागानं फुसफुसत उद्गारला. "नाही रविराव! या डागण्या नाहीत" तो शांतपणे म्हणाला. " शास्त्र्याशी इथं महत्त्वाची राजकारणी बोलणी चालली आहेत. सबंध हिंदुस्थानभर मी जे राजकारण उभं करु पाहतो आहे त्यात शास्त्री हा महत्त्वाचा दुवा आहे. तो हुशार आहे. साहेबाला वळवायचं कसब त्याच्यात आहे. अशा माणसाचा कसा उपयोग करुन घेता येईल ते मी पाहात आहे आणि शास्त्री तरी माणूसच आहे ना? रविराव! आपण माणसं इथून तिथून सारखी; पण राजकारणात हे खासगी दोष पाहायचे नसतात. अरे, आपण भिल्लरामोशांना जवळ करायला निघालो आहोत. ते काय कमी दुर्गुणी असतात? पण राज्याच्या उपयोगी पडणारे गुण पाहून आम्ही त्यांना जवळ करतो. मग शास्त्री तर मुरलेला राजकारणी पुरुष आहे. त्याच्या व्यक्तीगत दोषांकडे पाहू नये!" "तात्या, या गोष्टी बोलायला ठीक आहेत. पण आग पेटली की मग आच समजते!" रविराव फुरंगटून म्हणाला. "तू म्हणतोस ते मी कुठं नाकबूल करतो आहे? पण मोठ्या ध्येयाकडे पाहून आपण आपली खासगी भांडणं बाजूला ठेवली पाहिजेत. रविराव, आग इथे माझ्यात काय कमी पेटली आहे? पण सारं विसरावंच लागतं! धारवाडचा किल्ला भाजून काढणं का मला अशक्य होतं ? पण आपल्याच माणसांविरुद्ध पेशव्यांचा दारुगोळा खर्ची पडला हे शल्य मागं राहिलं असतं. म्हणून अपमान गिळून मी निराळ्या मार्गानं किल्ला घेतला. रविराव, केशरची कथा ती काय? अरे, आपण पराक्रमानं पर्वत उभा करावा. अशा एक सोडून शंभर केशर हात जोडून उभ्या राहतील! दे! वचन दे! शास्त्री इथं आहे तोपर्यंत मी केशरचं नाव काढणार नाही म्हणून!" असं म्हणून त्यानं आपला हात उत्कंठतेनं पुढं केला. रविरावानं हातावर हात ठेवला. "तात्या! आजपर्यंत तुमच्या आज्ञेबाहेर वागलो नाही. घ्या हे वचन! आजपासून केशरचं नाव टाकलं.!" रविराव उठला. अधिक काही न बोलता तो मागं वळाला आणि सदरेतून निघून गेला. ---------------------------

वेचा सुरेखच शिवाय उत्कंठा ताणणारा. पण ही कादंबरी वाचलेली नाही हे नक्कीच. सागर मित्रा, अधिक संकेत लागतीलच.

सागर, तू म्हणतोस ते पटले, भरपूर संकेत दडलेले आहेत ह्या वेच्यात! पण त्याचा काय उपयोग? ही कादंबरी वाचलेली नाही एवढे समजण्यास हे संकेत उपयोगी पडले हे नक्की............. :)

सागर, ही कादंबरी वाचलेली नाही, पण अंदाज पाठवला आहे. म्हणतात ना.... अंदाजपंचे, बारोदरसे!!!!

वेचा संपादित करायचे गेल्या २ दिवसांपासूनचे सर्व प्रयत्न वाया गेले. वारंवार पुवि गंडले. :( त्यामुळे आता पुवि चालू दिसत असले तरी इथे जाहीर करतो आहे वेच्याचे सर्वप्रथम विजेते आहेत पुस्तकप्रेमी दिग्गज वाचक दिगम्भा त्यानंतर वल्ली याने पहिल्याच प्रयत्नात लेखक ओळखला आणि नंतर पुस्तकही लगेच ओळखले :) यशोधरा ने खरडवहीत ओळखले आहे असे सांगितले आहे तरी व्यनि केलेला नाही त्यामुळे तिच्या मनात कोणते पुस्तक आहे हे मला कळाले नाही. तरी तिच्या वाचनाचा आवाका बघता तिने ओळखले असावे असे वाटते आहे. स्पिन डॉक्टर आणि चित्रा यांनीही प्रयत्न केले पण त्यांची उत्तराची दिशा चुकली आहे पण लवकरच संकेत वाचून ते ओळखतील याची खात्री आहे. :)

In reply to by सागर

मित्रा सागर, तू उत्तर जाहिर केल्यानंतर या लेखकाविषयी आणि त्याच्या पुस्तकांविषयी येथे चर्चा करूच. या लेखकाने इतकी गाजलेली पुस्तके लिहूनही याचे नाव सर्वश्रेष्ठ लेखकांच्या यादीत घेतले जात नाही हे विशेष.

इथेच प्रतिसाद म्हणून संकेत देतो आहे पुन्हा संपादित केले तर पुवि चालेल याची खात्री नाहिये संकेत क्र. २ : ही एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीवरची ऐतिहासिक कादंबरी आहे संकेत क्र. ३ : या कादंबरीचे लेखक कादंबर्यांची नावे नेहमी एकाच शब्दाची,शक्यतो लहान आणि समर्पक देतात. संकेत क्र. ४ : लपवलेला भाग वेच्यात वाढवलेला आहे. (इथे प्रतिसादात दिलेला आहे) वेच्याचे पहिले विजेते आहेत दिग्गज पुस्तकप्रेमी दिगम्भा दुसरे विजेते आहेत वल्ली या दोघांनीच आतापर्यंत उत्तर ओळखले आहे. विजेत्यांचे अभिनंदन. अजून १ उत्तर आले की मग हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते जाहीर करेन पुवि वारंवार गंडल्यामुळे या सुंदर पुस्तकातीतील वेचा-कोड्याचा सगळा रस निघून गेला हे खेदाने म्हणावे लागते आहे :( पुस्तकविश्वच्या टीमला आणि मालकांना विनंती की तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करुन पुस्तकविश्व स्थिर करावे. स्पिन डॉक्टर आणि चित्राने पण प्रयत्न केले. पण त्यांची दिशा चुकली आहे. नवीन संकेत वाचून त्यांना हे पुस्तक लगेच ओळखता यावे :) वेच्यातील लपवलेला भागः धारवाडचा किल्ला भाजून काढणं का मला अशक्य होतं ? पण आपल्याच माणसांविरुद्ध पेशव्यांचा दारुगोळा खर्ची पडला हे शल्य मागं राहिलं असतं. म्हणून अपमान गिळून मी निराळ्या मार्गानं किल्ला घेतला.

अबब! किती हे संकेत - असा एक कोणी माणूस होता - १. जो सदरेत बसत असे; २. ज्याची शास्त्र्याशी महत्त्वाची राजकारणी बोलणी चालली होती; ३, ४. शास्त्री मुरलेला राजकारणी पुरुष होता आणि त्याचे साहेबाशी सलोख्याचे संबंध होते; ५. जो सबंध हिंदुस्थानभर एक राजकारण उभं करु पाहत होता; ६. जो भिल्लरामोशांना जवळ करायला निघाला होता; ७. जो मोठ्या ध्येयाकडे पहात होता; ८. ज्याच्यात आग पेटली होती; ९. ज्याला "तात्या" असे म्हणत असत (म्हणजेच तो सर्वोच्च पदी नव्हता); माझ्या मते १,२,३,४,९ वरून तो माणूस कोण हे पुस्तक न वाचलेल्यानाही कळावे आणि ५,६,७,८,९ वरून ज्याने वाचले आहे त्याला पुस्तकाची अचूकपणे आठवण व्हावी. वा! सागर, असा असावा वेचा! - दिगम्भा

In reply to by दिगम्भा

या सुंदर पुस्तकाची एक नव्याने ओळख करुन द्यावी असाही हेतू होताच. कारण ही सुंदर कादंबरी वाचली नाहिये असे अनेक वाचक असू शकतात. त्यामुळे एवढे संकेत असलेला वेचा देण्यासाठी मात्र बर्‍यापैकी शोधाशोध करावी लागली :) प्रत्येक मराठी वाचकाने वाचले पाहिजे असे हे नितांत सुंदर पुस्तक आहे

In reply to by सागर

सागर, सहावी-सातवीत, म्हणजे जवळ-जवळ ३०-३२वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली होती, खूप आवडली होती. आता पार विस्मरणात गेलेली... पुन्हा एकदा नव्याने वाचायला हवी... ह्या लेखकाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! पुवि फारच गंडवतंय..... ह्यावर काय उपाय????

येथे प्रतिसाद स्वरुपात उत्तरे जाहीर करतो आहे. त्यानंतर मुख्य वेचा संपादीत करुन उत्तर जाहीर करायचा प्रयत्न करेन. आधी सांगितल्याप्रमाणे दिगम्भा हे या वेच्याचे प्रथम विजेते आहेत आणि वल्ली दुसरा विजेता आहे. तिसरी विजेती आहे यशोधरा. या तिघांनी हे पुस्तक विनाकष्ट ओळखले :) वर दिगम्भांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे वेच्यातच खूप संकेत दडलेले होते त्यामुळेही हे पुस्तक अनेक जण ओळखू शकतील असा माझा अंदाज होता. अर्थात पुस्तक वाचलेले नसल्यास सर्वांनी अवश्य वाचावे ही विनंती. एका नजरेआड राहिलेल्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वाची ही अफलातून कहाणी आहे. वेच्याचे उत्तरः पुस्तकाचे नाव : झेप लेखक : ना.सं.इनामदार (या लेखकाच्या सर्व कादंबर्‍यांची नावे एका शब्दाचीच आणि अर्थपूर्ण असतात. जसे शहेनशहा, राऊ, राजेश्री,इ..) सदर वेच्यातील तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वाच्या काळात मराठी साम्राज्याला हिंदुस्थानात आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचा एक मंत्री - एकांडा शिलेदार - त्र्यंबकजी डेंगळे हा आहे. एका सामान्य माणसाने घडवलेला हा असामान्य इतिहास अवलोकन करताना तुम्हाला नक्कीच एक अत्भुत चरित्र वाचतो आहे असा फील नक्की येईन.

इनामदारांचे एकही पुस्तके मी अजून वाचलेले नाहीये पण कुठल्याही ग्रंथप्रदर्शनात यांची सर्वच पुस्तके हटकून उपस्थित असतातच शिवाय वरचेवर त्यांच्या नवनवीन आवृत्त्याही सातत्याने प्रकाशित होत असतात ही बाबच त्यांची वाचकप्रियता सिद्ध करण्यास पुरेशी आहे. इनामदारांनी इतिहासातील ठळक व्यक्तीमत्वांबरोबरच काहीश्या दुय्यम व्यक्तीरेखांनाही नायकत्व बहाल केल्याचे दिसते. उदा. राजेश्री, शहेनशहा व राउ म्हणजे शिवाजी महाराज,औरंगजेब, पहिले बाजीराव पेशवे या इतिहास बदलणार्‍या व्यक्तिमत्वांबरोबरच झेप मध्ये त्रिंबकजी डेंगळे, झुंज मध्ये यशवंतराव होळकर, शिकस्त मध्ये पार्वतीबाई पेशवे व तोतया, मंत्रावेगळा मध्ये दुसरा बाजीराव ही काहिशी दुय्यम व्यक्तिमत्वेही भेटत जातात. इतका चतुरस्त्र आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांनाच नायक करणारा हा लेखक मराठीतील सर्वकालीन श्रेष्ठ लेखकांच्या यादीत का समाविष्ट होउ शकत नाही याचे कारण तसे अज्ञातच. इनामदारांच्या फॅन असलेल्या एका मित्राने बोलताबोलता सांगितले होते की यांची पुस्तके तशी पाल्हाळिक आणि इतिहासाला पूर्णपणे न्याय देणारी नसतात. मूळ इतिहासापासून काहीशी भरकटत जाणारी असतात. सागरने वेचा देउन उत्कंठा वाढवली आहेच. त्याची परिणती आता इनामदारांचे एखादेतरी पुस्तक घेउन होणार हे निश्चित. :)

In reply to by वल्ली

मित्रा, इनामदारांच्या कित्येक कादंबर्‍यांची १० ते २० पुनर्मुद्रणे झाली आहेत. झेप ही देखील अशीच एक कादंबरी. झेप ची १० पुनर्मुद्रणे झाली आहेत. झुंज ची त्यापेक्षा जास्त आहेत. शहेनशहा, मंत्रावेगळा, आणि राऊ यांची पुनर्मुद्रणे बहुतेक या २ कादंबर्‍यांपेक्षा जास्त आहेत. ही पुस्तके संग्रहात हवीच हवी :)