ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८६

पुस्तकाचे नाव

संकेत १: दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी.

---

१९५७ साल सरत आलं होतं. एके दिवशी 'मोसाद'चा प्रमुख इस्सेर हॅरेल याच्या टेबलावरील फोन खणखणू लागला. परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वॉल्टर एटन यांचा जेरूसलेमहून फोन होता. ते म्हणाले, 'तुझ्यासाठी माझ्याजवळ काहीतरी माहिती आहे. त्यासाठी आपण शक्य तितक्या लवकर भेटणं आवश्यक आहे.' एरवी एटन हे शांत व संयत स्वभावाचे. त्यांचा आवाजही संथ. पण या खेपेस त्यांच्या आवाजात कमालीची अधीरता होते. ते एक्सायटेड वाटत होते. त्यांना जे काही सांगायचं होतं, ते फोनवर सांगू इच्छित नव्हते हे नक्की. तेल-अविव्हला एका वकिलाच्या पार्टीला ते निघाले होते व तिथं पोहोचताच आपण भेटूया असं ते म्हणाले. तेव्हा रमत गॅन कॅफे येथे दोघांचं भेटायचं ठरलं. त्यांना एवढं काय बरं सांगायचं असेल, या विचारात हॅरेल गढून गेला.

दोघं भेटले तेव्हा एटन यांचा चेहरा उत्फुल्ल होता. त्यांना भावना आवरण कठीण जात होतं. प. जर्मनीतील रिपरेशन्स मिशनचे प्रमुख डॉ. शिनार यांनी एक तातडीचा संदेश पाठवला होता. अॅडॉल्फ आईषमान जिवंत असून तो अर्जेंटिनात वास्तव्य करत आहे व त्याचा तिथला पत्ताही ठाऊक आहे, अशी ती खळबळजनक माहिती होती. दोघांचं यावर अधिक काही बोलणं झालं नाही. या माहितीचा विनाविलंब तातडीनं शोध घेतला जाईल, सत्यता पडताळून पाहिली जाईल व आईषमानला आम्ही धुंडाळून काढू, अशी आश्वासनं देऊन हॅरेल तेथून बाहेर पडला.

In reply to by वल्ली

श्रामोंचा वेचा देण्यातील सहभाग पाहून सुखावून गेलो. :) पुन्हा मैदानात सक्रीयतेने सहभागी झाल्याबद्दल स्वागत आणि अभिनंदन श्रामो :)

श्रामो वेचा अगदी नेमक्या पुस्तकाकडे दिशानिर्देश करणारा आहे. ज्याने वाचले आहे त्याला लगेच पुस्तकाचे नाव सहजच आठवेल माझी स्मृती थोडी दगा देते आहे. पण हे पुस्तक मी १००% वाचलेले आहे. नेमके पुस्तक कोणते हे मात्र आठवत नाहिये. पुस्तक खूप प्रसिद्ध आहे एवढे नक्की :)

वल्ली आणि देवेन्द्र प्रभुणे यांनी पुस्तक बरोबर ओळखले. अभिनंदन. सागर आणि टण्या यांनीही उत्तर द्यायचा प्रयत्न केला. पण चुकले.

In reply to by श्रावण मोडक

वल्ली आणि देवेन्द्र चे मनापासून अभिनंदन. खंदे वाचक शोभतात :) श्रामो, वेचा असा होता की अनुवादीत पुस्तकच वाटले पाहिजे. उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे.

हा धागा संपादित करून आणखी संकेत देण्याचे गेल्या तीन दिवसांतील प्रयत्न अपयशी झाले. आज धागा संपादित करून पुस्तकाचे नाव जाहीर करण्याचा प्रयत्नही फसला. माझीच अशी पारध होत गेली. पुस्तकाचे नाव - पारध लेखक - अशोक जैन प्रकाशक - राजहंस प्रकाशन. म्हणून आता प्रतिसादाच्या रुपात उत्तर देतोय. मदतनीस यांनी कृपया पुस्तक वाढवावे.

In reply to by श्रावण मोडक

एका इंग्रजी कादंबरीत आईशमनला पकडण्याचे कथानक आले आहे. नेमके नाव आठवत नाहीये. ती कादंबरी मी वाचली आहे हे पुस्तक मात्र अजिबात वाचलेले नाहिये. पुस्तक वाचले आहे हा भ्रम त्यामुळेच आला :( माझीच पारध झाली श्रामो, यावेळी जबर्‍या चकवले मला वेच्याने ... पुस्तक अर्थातच वाचायचे आहे या यादीत अ‍ॅडवले आहे :)

In reply to by सागर

हे पुस्तक मी नक्कीच वाचलेले नव्हते. पण या विषयावर अशोक जैन यांनी 'पारध' लिहीलेले आहे हे माहित होते. आणि ते नेमके बरोबर निघाले. पुस्तक आता अर्थातच वाचायचे ठरवले आहेच.

In reply to by श्रावण मोडक

काय सांगता! मी पारध वाचले आहे (आता होते म्हणावे लागेल) नाव सांगुनही वेचा आठवत नाहीये :( पुस्तक पुन्हा वाचायला पाहिजे :)