वृत्तपत्र / मासिकातील वाचनीय स्तंभ

वृत्तपत्र / मासिकातील वाचनीय स्तंभ येथे एकत्र करूया.. स्तंभ कॉपी पेस्ट करणे शक्य नसेल तर त्याच्या लिंका पेस्ट करूया..

बऱ्याचदा असे होते की कांही स्तंभ आवडतात आणि संकलीत करावेसे वाटतात.. असे संकलन करूया. विषयाची कोणतीही अट नाही.

कुलवंत सिंग कोहली. दादरच्या प्रीतम हॉटेलचे दुसऱ्या पिढीतले मालक.. त्यांनी लोकसत्ता मध्ये ये है मुंबई मेरी जान नावाची अप्रतिम लेखमाला लिहिली आहे.

https://www.loksatta.com/lokrang/yeh-hai-mumbai-meri-jaan/

वेगवेगळे सिनेकलाकार, सुपरस्टार, राजकारणी व अनेक सामान्य माणसे हॉटेल प्रीतमचे द्वारे कशी कशी जोडली गेली याचे किस्से आणि सुंदर आठवणी नक्की वाचनीय आहे.

या लेखमालेचे याच नावाने पुस्तक निघाले आहे.

रफ स्केचेस - सुनीताबाई

सुभाष अवचटांनी रेखाटलेले सुनीताबाईंचे अप्रतिम व्यक्तिचित्र...

उत्तम. लिंकांचा पर्याय आहेच, मात्र एक शंका. स्तंभ कॉपी पेस्ट करण्याने प्रताधिकाराचा भंग होऊ शकतो का?