'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -१०
भाग-९ दुसर्या पानावर गेला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.
आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.





शिवराम कारंथांची पुस्तके
शिवराम कारंथांची पुस्तके कधीपासून हवी होती ती अखेर पुण्यात रसिक साहित्य येथे मिळाली.
पुस्तके अर्थात बर्यापैकी जुनाट आणि सध्या अतिशय दुर्मिळ आहेत. मिळाली हेच थोडके.
१. चोमा महारः शिवराम कारंथ - अनु. श्यामलता काकडे - किं ३५ रू. आवृत्ती-१९८५ कॉन्टीनेंटल प्रकाशन (मूळ कन्नड कादंबरी-चोमन दुडी)
दक्षिण कर्नाटकातल्या चोमा महाराचे चित्रण करणारी कांदबरी.
२. मुकज्जी - शिवराम कारंथ - अनु. मीना वांगीकर - किं ५० रू. आवृत्ती-१९९३ कॉन्टीनेंटल प्रकाशन (मूळ कन्नड कादंबरी-मुकज्जीय कनसुगलु अर्थात मुक्या आजीची स्वप्ने) ज्ञानपीठ पारितोषिक विजेती कादंबरी.
नंतर डेक्कन वर पॉप्युलर प्रकाशन येथे गेलो जाताना गरवारे पुलाच्या पुढे रस्ता ओलांडताना सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक दिसले.
१ ते ११ डिसेंबर पर्यंत खास सवलतीत पुस्तके मिळत आहेत. तिथे पुढील पुस्तके २५% सवलतीत घेतली.
३. द दा विंची कोड - डॅन ब्राउन - अनु. अजित ठाकूर (पुस्तक आधी लायब्ररीतून वाचलेले होते, पण हे संग्रही हवेच म्हणून घेतले) किं. ३२० रू.
४. अॅडम - रत्नाकर मतकरी, प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस. किं २८० रू.
मतकरीं जेमतेम ३ कादंबर्या लिहिल्या आहेत. पैकी 'जौळ' आणि 'पानगळीचे झाड' याआधीच वाचलेल्या आहेत. 'अॅडम' पण २ दशकांपूर्वी लिहिलेली बोल्ड कादंबरी आहे. अश्लिल कादंबरी असा शिक्का बसल्याने बरीच वादग्रस्तही झाली होती. मेहतांनी नुकतीच नव्याने बाजारात आणलेली आहे. स्त्रियांकडून सतत वापरल्या गेलेल्या एका पुरुषाचे चित्रण ही कादंबरी करते.
पुस्तके मिळाल्याबद्दल अभिनंदन
कारंथांची ही पुस्तके आता जवळपास कुठेच मिळत नाहीत.
दा विंची संग्रहात हवेच. अजित ठाकूर यांनी मराठी अनुवाद सरस केला आहे.
माझी पण २-३ पारायणे झाली आहेत. तरी दा विंची अजूनही वाचावासा वाटतो.
माझ्या मागच्या यादीत १ पुस्तक राहिले होते
सिंहासन बत्तिशी - ह.अ.भावे - वरदा प्रकाशन - ४५ रु. फक्त ( जवळपास २०० पानी पुस्तक आहे)
कथासरित्सागरही घ्यायचे आहे. पण ते नंतर कधीतरी.
मतकरींचे पुस्तक जवळपास प्रत्येक खरेदीत असतेच
अॅडम वाचून झाले की नक्की सांग कशी आहे ते.
अवांतरः गिरिश ओक मोठा माणूस आहे. तू हाय म्हटले असते तरी ते आपुलकीने बोलले असते.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मुकज्जी कशीय?
मुकज्जी बद्दल मागे एकाकडून ऐकले होते. कशी आहे कादंबरी?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
मुकज्जी वाचली नाही अजून.
मुकज्जी वाचली नाही अजून. वाचून झाले की परिचय नक्कीच देईन.
पण कारंथ म्हटल्यावर चांगली असावीच.
नाशिकहून भावाला काही पुस्तके
नाशिकहून भावाला काही पुस्तके आणायला सांगितली होती. फक्त एकच पुस्तक मिळाले.
सह्याद्री - स.आ. जोगळेकर
प्रथमावृत्ती: १९५२
द्वितीयावृत्ती: १९९३
किं. २५० रू.
प्रकाशकः शुभदा सारस्वत प्रकाशन
सध्या हे अतिशय दुर्मिळ पुस्तक आहे.
सह्याद्रीबद्दल थोडे सांगशील का मित्रा?
वल्ली मित्रा,
नावाप्रमाणे हे पुस्तक सह्याद्री पर्वतांवर आहे असा अंदाज करतोय. पण ह्या पुस्तकात नक्की काय आहे ते सांगितलेस तर आनंद होईल.
सह्याद्री पर्वतावर असेल आणि अजून एक प्रत मिळत असेल तर प्लीज माझ्यासाठी घेऊन ठेव रे मित्रा.
मला आवडेल असे पुस्तक संग्रहात ठेवायला.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
होय. अभिजात पुस्तकातच याची
होय.
अभिजात पुस्तकातच याची गणना केली जाते.
सह्याद्रीच्या निर्मितीपासूनची माहिती यात आहे.
इथल्या नद्या, खोरी, किल्ले, घाटवाटा, लेणी, त्यांची संरचना, मंदिरे, सातवाहन, क्षत्रप, यादव, शिवाजी महाराज आदी सर्वच विषयांना स्पर्श केला गेला आहे.
लेण्यांबद्दल तर १५०/१७५ पानांचा खास विभागच आहे.
अर्थात पुस्तक जुने म्हणजे ५० च्या दशकातले असल्याने नंतर झालेल्या काही अधिक संशोधनांनी(उत्खनने, नाणी वगैरे अधिक पुरावे) उजेडात आणलेल्या इतिहासाची वानवा जाणवते. पण सह्याद्रीवेड्या प्रत्येक माणसासाठी हे पुस्तक हवेच.
अजून एखादी प्रत मिळत असेल तर तुझ्यासाठी नक्कीच घेऊन ठेवतो. माझ्या मामेभावाच्या मित्राचेच ते पुस्तकांचे दुकान आहे. पण ही प्रत मात्र त्याच्याकडे एकमेव होती.
पुस्तक काल रात्रीच माझ्या हातात पडले असल्याने डिट्टेलवार पाहता आले नाही पण लवकरच तुला त्यातली इंडेक्स पाठवतो.
प्रताधिकार?
हे पुस्तक अजुन प्रताधिकारात आहे का?
लेखक जिवंत नसतील व काहि 'क्ष' वर्षे उलटून गेली असतील तर पुस्तक प्रताधिकारमुक्त होते. हा 'क्ष' किती आहे?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
सर्वसामान्यपणे लेखकाच्या
सर्वसामान्यपणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी पुस्तक प्रताधिकारमुक्त होते. जोगळेकरांचा मृत्यु कधी झाला याबद्दल नक्की माहिती नाही. कदाचित पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते असावे. तरी ६० वर्षे नक्कीच झाली नसतील त्यामुळे हे पुस्तक अजूनही प्रताधिकारातच असावे.
अरे वा मस्तच मित्रा
असे असेल तर हे पुस्तक मला हवेच आहे.
माझी खात्री आहे की हे पुस्तक एकदम जबरदस्त असणार आहे
अजून एखादी प्रत माझ्यासाठी तू मिळवू शकलास , तर मला प्रचंड आनंद होईल
धन्यवाद मित्रा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नक्कीच
एखादी प्रत मिळाली तर अवश्य घेऊन ठेवेनच.
रसिकमध्ये चौकशी करून बघ. एखादी जुनी प्रत तिथे कदाचित मिळू शकेल.
India After Gandhi
आजच India After Gandhi फ्लिपकार्टवर ऑर्डर केले आहे.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
डेमन रन्यन!
डेमन रन्यनच्या ब्रॉडवे कथा वाचून पहा.
रहस्यकथांच्या प्रेमींसाठी -
अर्नेस्ट ब्रामाह च्या मॅक्स कॅरडॉस या अंध डिटेक्टिव्ह कथा
मेल्व्हिल डॅविसन पोस्ट च्या अंकल अॅब्नर कथा
चेस्टर्टनच्या फादर ब्राउन कथा म्हणजे तर इंग्रजी गद्याची मेजवानीच.
फ्रेडरिक फॉरसाइथ च्या नो कमबॅक्स मधील "प्रिव्हिलेज" ही कथा एकदम खास.
आणि "फ्लावर्स फॉर अॅल्जेर्नन" ही दीर्घकथा चटका लावणारी आहे - केवळ अविस्मरणीय.
वाचावे तेवढे थोडेच.
- दिगम्भा
नवी माहिती
दिगम्भा,
डेमन रन्यन या लेखकाचे नावही मी कधी ऐकले नव्हते

चांगल्या लेखकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
मी अलिकडे बुकगंगा कडून पुढील पुस्तके घेतली आहेत
दुपानी - दुर्गा भागवत
पाली प्रेमकथा - दुर्गा भागवत
देवदासी,पोतराज,वाघ्या-मुरळी, रूप-स्वरूप-विकृती - बळवंत कांबळे
मर्हाटी लावणी - म. वा. धोंड
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
एकदम 'हटके' पुस्तके घेतलीस रे
एकदम 'हटके' पुस्तके घेतलीस रे यावेळी.
होय खरे आहे
पहिली २ दुर्गाबाईंची कोणतीही पुस्तके मेजवानी असते यासाठी घेतली
दुसरी २ लावणीच्या शोधकार्यात थोडी उपयोगी पडू शकतील म्हणून घेतली
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
'लावणीच्या' शोधकार्यात
'लावणीच्या' शोधकार्यात म्हणजे? प्रबंध वगैरे लिहायचा विचार आहे की काय?
नाही प्रबंध नाही फक्त शोध
प्रबंध वगैरे नाही लिहिणार रे मित्रा.
फक्त शोध घेतोय एवढेच
मन्मथ शिवलिंगाने १४ व्या शतकांत लिहिलेली भवानी देवीवरील लावणी ही ज्ञात असलेली पहिली लावणी समजली जाते आहे. पण लावणी आणि अन्य लोककलांचा उगम थेट सातवाहन कालापर्यंत जातो आहे. त्यामुळे ही एक वेगळी मजा मी घेतोय. पण सध्या १-२ महिना त्यात खंड पडेल असे दिसतेय. नंतर परत जोमाने सुरु करेनच
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
गफलत ....
सागर
क्षमस्व, चुकून दुसरीकडे देण्याचा प्रतिसाद इथे आला, त्यामुळे इथे भलतेच अवांतर झाले.
आता हा प्रतिसाद मी योग्य तेथे हलवला आहे - (ओ. हेन्री व) लघुकथांच्या धाग्यावर.
रस असल्यास तिथेही नजर टाकावी.
पण आधीच धोक्याची सूचना - सर्व चर्चा इंग्रजी पुस्तकांविषयी झाली आहे.
- दिगम्भा
तो धागा उशीरा पाहिला
दिगम्भा,
तो धागा मी या धाग्यानंतर पाहिला तेव्हाच लक्षात आले होते.
पण होते ते चांगल्यासाठी या उक्तीप्रमाणे तुमची धोक्याची सूचना "सर्व चर्चा इंग्रजी पुस्तकांविषयी झाली आहे." मी इथे प्रतिसाद दिल्याने माझ्या अनायासेच उपयोगी आली
ओ हेन्री मी खूपच कमी वाचलाय. फक्त १ पुस्तक

त्यामुळे त्या धाग्यावर वाचक म्हणूनच मी बरा आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
www.bookganga.com वरुन घरबसल्या खरेदी...
www.bookganga.com इथून खालील पुस्तकांची खरेदी केली, घरबसल्या...
छान खरेदी
मस्त खरेदी केलीस चित्रा
कोबाल्ट ब्लू
वाडा चिरेबंदी
ही २ पुस्तके आहेत माझ्याकडे
पुलंचे तीन पैशाचा तमाशा घ्यायचे राहिले आहे. ते तुझ्यामुळे घ्यायची आठवण झाली
माझ्या माहिती प्रमाणे तीन पैशाचा तमाशा हे उपलब्ध नव्हते. पण असेल तर तू लकी आहेस.
बुकगंगावरुन खरेदी करण्याअगोदर त्यांना फोन किंवा ईमेल करुन हवी असलेली पुस्तके आधी उपलब्ध आहेत की नाही ते कन्फर्म करत जा. मी तेच करतो. उगाच नंतर पैसे ट्रान्सफर केले म्हणून दुसरे पुस्तक घ्यायला नको
मला तसा अनुभव आला होता. पण त्यांची सेवा अतिशय उत्कृष्ट आहे. पुस्तक उपलब्ध करण्यासाठी खूप छान प्रयत्न करतात. व बरेचदा मिळवतातही.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
'कोबाल्ट ब्लू' सचिन कुंडलकरचे
'कोबाल्ट ब्लू' सचिन कुंडलकरचे ना?
मध्यंतरी त्याचे लेख सकाळमध्ये येत होते. त्यावरून तरी सचिन कुंडलकरबद्दल प्रतिकूल मत तयार झाले होते.
होय त्यांचेच आहे
पण व्यक्तीवरुन त्याची कलाकृती पण प्रतिकूल असेल असे मत करुन घेणार नाहीस याची खात्री आहे मित्रा
सहज मिळाले तर अवश्य वाच. चांगले आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नक्कीच वाचेन रे मित्रा.
नक्कीच वाचेन रे मित्रा.
कोबाल्ट
कोबाल्ट ब्लु बद्दल मागे बरेच वाचण्यात आले होते. सागर दोस्ता, एका सुट्टीत संपव आणि सांग आम्हाला कसे वाटले ते !
होय नक्कीच
मित्रा, वाचले की या पुस्तकावर नक्की लिहिणार आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/